Online मराठी लग्न बायोडाटा maker, पुणे (महाराष्ट्र)
OnlineBiodata.in हे लग्नासाठी मराठी, हिंदी आणि English बायोडाटा online तयार करण्याचे साधन आहे. तुम्ही form मध्ये माहिती भरता, template निवडता, preview बघता आणि PDF download करता. यासाठी Word, Photoshop किंवा designer ची गरज लागत नाही.
ही वेबसाईट 2023 मध्ये सुरू झाली. आम्ही matrimonial सेवा किंवा वधू-वर सूचक मंडळ नाही; आम्ही फक्त बायोडाटा तयार करण्याचे साधन देतो.
नमस्कार, मी Sangharsh Sulke. मी महाराष्ट्रातील software developer आहे आणि OnlineBiodata.in मी स्वतः बनवली आणि चालवतो. Templates, biodata form, PDF तयार करणारे engine आणि blog वरील माहिती यांची जबाबदारी माझी आहे.
लग्नाचा बायोडाटा बनवताना बहुतेक कुटुंबांना एकच अडचण येते: मराठी font नीट बसत नाही, पान एकात मावत नाही, किंवा designer कडे जावे लागते. हेच सोपे करण्यासाठी मी ही वेबसाईट बनवली. देवाचा फोटो, "॥ श्री गणेशाय नमः ॥" सारखे शीर्षक, कुलदैवत, गोत्र, पत्रिका तपशील असे मराठी बायोडाटामध्ये लागणारे सर्व पर्याय form मध्येच दिले आहेत.
पारंपरिक आणि modern design चे templates. प्रत्येक template चा free preview बघता येतो.
तुमच्या कुटुंबाला सोयीच्या भाषेत बायोडाटा तयार करा.
सध्या सर्व 50 templates पूर्णपणे मोफत आहेत. Preview आणि PDF / image download साठी कोणतेही payment लागत नाही.
बायोडाटा मधली माहिती फक्त बायोडाटा बनवण्यासाठी वापरली जाते, कोणालाही विकली किंवा शेअर केली जात नाही.
Blog वर बायोडाटा मध्ये काय लिहावे, फोटो कसा निवडावा, दुसऱ्या लग्नासाठी बायोडाटा कसा लिहावा अशा प्रश्नांवर लेख आहेत. हे लेख महाराष्ट्रातील कुटुंबांमध्ये पाळल्या जाणाऱ्या सर्वसाधारण पद्धतींवर आधारित आहेत. प्रत्येक समाजात आणि कुटुंबात पद्धती वेगळ्या असू शकतात. एखादी माहिती चुकीची वाटल्यास कृपया आम्हाला कळवा, आम्ही ती दुरुस्त करू.
Email: support@onlinebiodata.in
सविस्तर पत्ता आणि फोन नंबर Contact Us पानावर दिला आहे.